प्रतिनिधी.
भारतीय पत्रकार संघाचे माजी बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या 46 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत विनोद गोलांडे यांचा वाढदिवस प्राथमिक शाळा नींबूत येथील मुलांना खाऊ वाटप करीत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बा.सा .काकडे विद्यालयाचे सचिव मदनराव काकडे, विक्रम काकडे, नींबूत ग्रामपंचायतचे सदस्य नंदकुमार काकडे, भारतीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भारतीय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोहम्मद शेख, शशिकांत अनपट, बालगुडे मॅडम, व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.