Image

कोऱ्हाळे बुद्रुकच्या उपसरपंचपदी राजेंद्र पवार

सोमेश्वरनगर- प्रतिनिधी
बारामती गावातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळत्या उपसरपंच आशाबी सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच हनुमंत जगदाळे होते. यावेळी उपसरपंच पदासाठी केवळ राजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज आला होता. यावेळी माजी सरपंच रवींद्र खोमणे, मावळत्या उपसरपंच आशाबी सय्यद, माजी उपसरपंच लता नलवडे, आबा पडळकर, दिव्यभारती खोमणे, ग्रामपंचायत सदस्य मोहन भगत, सुनीता खोमणे, वनिता निकम उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
निवडीनंतर बोलताना उपसरपंच राजेंद्र पवार म्हणाले की सतीशमामा खोमणे यांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न करेन.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026