बारामती ! प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्यातर्फे श्री. संत श्रेष्ठ सोपानकाका पालकीच्या वारकऱ्यांसाठी औषध उपचाराचे आयोजन

Uncategorized

 .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यात श्री संत सोपान काका महाराजांचे आगमन झाले असता आज सोमेश्वर या ठिकाणाहून कोऱ्हाळे या ठिकाणी पालखी मुक्कामासाठी रवाना झाली आहे . यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्यातर्फे सदोबाची वाडी या ठिकाणी वारकरी संप्रदायासाठी औषध, गोळ्यांचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ चे सर्व डॉक्टर, आशा सेविका , कर्मचारी उपस्थित होते. व वारकरी संप्रदाय यांना कुठल्या प्रकारचे आजार होत असल्याचे विचारून त्या प्रकारची गोळी देऊन त्यांना सहकार्य केले जात आहे . यावेळी वारकऱ्यांकडून डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले व असेच काम पुढील भविष्यात देखील आपण करत रहा असा आशीर्वाद देण्यात आला .