प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि.२८/०६/२०२५ रोजी सकाळी ८•०० वाजता आषाढी वारी निमित्त अभिरूप वारीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. मुलींनी डोक्यावर तुळस घेतली.वारकरी वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी खांद्यावर विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानोबांची पालखी घेतली.त्यात एक रोप ठेवून पालखी समोर अब्दागिरी, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ मृदंगाच्या निनादात निंबुत गावात अभिरूप आषाढी वारी संपन्न झाली. यावेळी शालेय परिसर व निंबुत गाव ज्ञानोबा तुकोबारायांच्या जयघोषाने दुमदुमला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्व पटवून देणारे फलक हातामध्ये घेऊन साक्षरते विषयी वारीमध्ये जनजागृती केली.
विद्यालय परिसरात आल्यानंतर शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांचे गोल रिंगण घेण्यात आले. यामध्ये टाळकरी पताकाधारी तुळशी घेऊन रिंगणात तसेच फुगडी खेळण्याचा आनंद लुटला .
विद्यालयातील या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे.उपाध्यक्षा सौ.सुप्रियाताई पाटील व मा.श्री.भीमराव बनसोडे सर तसेच मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनी शुभेच्छा दिल्या.