प्रतिनिधी.
बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित 57 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना बालगंधर्व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
यावेळी बारामती तालुक्यातील नींबूत येथील जितेंद्र काकडे यांना देखील नाट्य व्यवस्थापन व निर्माता या कार्याबद्दल बालगंधर्व परिवाराच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जितेंद्र काकडे हे एक उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत याचबरोबर नाट्य व्यवस्थापन निर्माता म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख काकडे यांनी निर्माण केलेली आहे काकडे यांना बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने काकडे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार श्री मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व बालगंधर्व रंगमंदिर अध्यक्ष तसेच तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या यांच्या शुभहस्ते काकडे यांना देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.