• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! तु आमचा वाद मिटवणार का असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत चाकू व फायटरने मारहाण ; वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सात जणांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल .
Image

बारामती ! तु आमचा वाद मिटवणार का असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत चाकू व फायटरने मारहाण ; वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सात जणांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल .

 .

प्रतिनिधी –

वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथे जातिवाचक शिवीगाळ करत चाकू व फायटरने हल्ला केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय श्रावण साऴवे वय ५३ वर्षे रा. वडगाव निंबाळकर ता.बारामती जिल्हा. पुणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सुरज दरेकर ,शुभम दरेकर ,सौरभ दरेकर ,भुषण दरेकर, ऋषिकेश दरेकर ,ओंकार दरेकर ,राहुल उर्फ बापु दरेकर सर्व रा. वडगाव निंबाऴकर दरेकर मऴा ता. बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दि. २९ रोजी रात्री १० वाजता वडगाव निंबाऴकर येथिल इरिकेशन बंगला येथिल अजित भोसले यांचे घराजवऴ आरोपी सुरज दरेकर याने तु महार आमचा वाद मिटवणार का असे म्हणुन जातीवाचक शिवीगाऴ करुन तु तुझी कीतीही घेऊन ये असे म्हणुन हातातील फायटर फिर्यादी संजय साळवे यांच्या उजवे डोऴ्याचे वर मारला त्यावेऴी त्यांचे उजवे डोऴ्याचे वर जखम होवुन रक्त येऊन ते खाली पडले त्यावेऴी फिर्यादी संजय साळवे यांच्या सोबत असणारे सचिन साऴवे हे त्यांना उचलण्याकरीता येत असताना परत फिर्यादी संजय साळवे यांना उर्वरित सर्व आरोपी यांनी हाताने लाथाबुक्याने छातीवर तोंडावर पाठीत मारहाण केली. त्यावेऴी आरोपी राहुल दरेकर हा हातात चाकु घेऊन फिर्यादी साळवे यांच्या अंगावर धावुन आला त्यावेऴी सचिन साळवे याने त्यास बाजुला केले.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करीत आहेत.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026