प्रतिनिधी.
दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढतानाचे दृश्य आपल्याला पहायला मिळत आहेत . दौंड ची खबर ताजी असतानाच बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये दादा ऊर्फ ऋतिक वायकर रा.करंजेपुल ता.बारामती जि.पुणे व बाळा ऊर्फ दयानंद होळकर रा.होळ ता.बारामती जि.पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी दादा उर्फ ऋतिक वायकर याने फिर्यादीचे वाढदिवसाचे दिवशी तिला फोन करून तुला वाढदिवसाचे गिफ्ट दयायचे आहे तु लोखंडी पुलाचे पलीकडे ये असे सांगुन बोलावुन घेतले . फिर्यादी अंधारात लोखंडी पुलाचे पलीकडे गेलेनंतर ऋतिक वायकर याने वाढदिवसाचे दिवशी त्याठिकाणीच जबरदस्तीने जवळ असलेले शेतातातील विहीरीसाठी बांधलेली रुममध्ये नेवुन फिर्यादीचे अंगाशी जबरदस्ती करण्यास सुरवात केली . तसेच बळजबरीने शारीरीक संबंध ठवेले व तु जर कोणाला सांगितले तर तुला खल्लास करून टाकीन अशी धमकी दिली .
तसेच आरोपी बाळा उर्फ दयानंद होळकर यानेही फिर्यादी घरी एकटीच असताना घरामध्ये जबरदस्तीने घुसुन फिर्यादी ओरडू नये म्हणून तोंड दाबुन जबरदस्तीने शरीरसंबंध केले असल्याचे धक्कादायक घटना घडली आहे .ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझे भावाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी होळकर यानी फिर्यादी हिला दिली.
दि. १ जून २०२५ रोजी दुपारी २.३० वा.चे सुमारास ऋतिक वायकर याने जबरदस्तीने त्याचा मित्र सनी यादव रा.वाघळवाडी ता. बारामती याचे घरी नेले त्यावेळी त्याचे घरी कोणी नसताना त्यांचे घराचे दरवाज्यास आतुन कडी लावुन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले व तु हा प्रकार कोणास सांगु नको जर सांगितला मी तुझे वाटोळे करेन तुझे लग्न होवु देणार नाही. तसेच तु जर हा प्रकार पोलीसांना सांगितला तर मी जेलमधुन सुटलेवर तुला व तुझे घरातील एकालाही जीवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली .
पुढील तपास डाँ.सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती हे करीत आहे.