प्रतिनिधी – फिरोज भालदार
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर संचालित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामतीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी सादोबाचीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शैक्षणिक धोरणानुसार सात आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी प्रत्यक्ष शेतकरी आणि गावांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले .
हा उपक्रम संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, प्राचार्या जया तिवारी, कार्यक्रम अधिकारी डॉ. मयुर पिसाळ, प्रा. शिवानी कोकणे देसाई व प्रा. पल्लवी कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थी आर्यन अब्दागिरे ,जयदीप जगताप ,अथर्व पाटील, तानाजी ठोंबरे, हरिप्रसाद पानसरे, ओंकार पाटील ,रोहन यादव व सिद्धेश कामठे यांनी सदोबाचिवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ आदी फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी उपसरपंच ऋषिकेश धुमाळ , ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर , संजय होळकर सर , शिक्षक तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून वृक्षारोपण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.