प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्ली यांच्या वतीने गाळप हंगाम २०२३-२४ साठीचा संपुर्ण देशभरातुन ऊसविकास, आर्थिक व तांत्रिक या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल उच्च साखर उतारा विभागातील सर्वात्कृष्ट सहकारी साखर साखर कारखाना म्हणुन डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, दिल्ली येथे पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष श्री. मिलींद कांबळे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व अधिकारी यांनी स्विकारला. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री श्रीमती निमुबेन बंभानिया, माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभु, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटिल, व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांच्या हस्ते करणेत आले.
या पुरस्कारामुळे अधिक जवाबदारी वाढली असुन सभासद शेतकरी व कारखान्याशी संबधित सर्व घटकाच्या विकासासाठी नेहमी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितले तसेच वसंतदादा शुगर इस्न्टीट्युट या संस्थेचेही यापुर्वी ४ पुरस्कार कारखान्यास प्राप्त झाले असुन राष्ट्रीय पातळीवरचा हा पहिलाच पुरस्कार आपल्याला मिळाला आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवारसो यांचे संचालक मंडळास असलेले वेळोवेळीचे मार्गदर्शन व कारखान्याचे सभासद शेतकरी, अधिकारी-कर्मचारी यांच्या योगदानामुळे व सहकार्यामुळे हा देशातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे श्री. जगताप म्हणाले.