महाराष्ट्र न्यूज 11 चा द्वितीय वर्धापन दिन सामाजिक बांधिलकी जपत साजरा.

Uncategorized

प्रतिनिधी.

महाराष्ट्र न्यूज 11 चे संपादक मोहम्मद शेख व त्यांच्या टीमने सामाजिक बांधिलकी जपत द्वितीय वर्धापन दिन वानेवाडी येथील विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी साजरा केला.
महाराष्ट्र न्यूज 11 च्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवरती शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र 11 न्यूज चैनल च्या माध्यमातून होत असते
भविष्यात देखील अशाच पद्धतीने समाजातील वंचित घटकांसाठी कायम कटिबद्ध राहू असे यावेळी बोलताना शेख यांनी सांगितले.
यावेळी समाजातील खऱ्या अर्थाने गरज असलेल्या पाच कुटुंबियांना रोजच्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे किट महाराष्ट्र न्यूज 11च्या टीम कडून देण्यात आले.
हर फुले बुके मोठा गवगवा करून वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा आपल्या माध्यमातून जर समाजातील गरजूवंतांना काही देता येत असेल त्यापासून त्यांना फायदा होत असेल तर मी नेहमीच अशा वर्धापन दिनासाठी कटिबद्ध आहे असे देखील यावेळी बोलताना शेख यांनी सांगितले
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित लोकनियुक्त सरपंच वानेवाडी गीतांजली ताई जगताप, माजी सरपंच दिग्विजय जगताप, इंद्रजीत भोसले, सुनील आबा भोसले, तुषार शिंदे, किशोर शेळके, भारतीय पत्रकार संघातील पत्रकार बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.