वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी श्री अमोल बनसोडे यांची निवड

Uncategorized

प्रतिनिधी

वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेची आज लोणंद येथील शासकीय विश्रामगृह येथे मासिक मीटिंग पार पडली.
या मीटिंगमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब डावरे आणि सर्व पदाधिकारी यांच्या एकमताने श्री अमोल बनसोडे यांची वीर  योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वीर योद्धा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली जातात
काही महिन्यांपूर्वीच लावलेलं हे छोटसं रोपट आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना दिसत आहे.
श्री अमोल बनसोडे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात
संभाषण कौशल्य तसेच संघटित राहणे हा श्री अमोल बनसोडे यांच्यातील एक महत्वाचा गुण असल्याचे यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष डावरे यांनी सांगितले ही निवड होताच नींबूत येथीलआदर्श मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने व संकेत लाईट्स अँड डेकोरेशन यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच अमोल बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की यापुढे देखील सर्वच समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्यासाठी कटिबद्ध राहीन.