• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव निंबाळकर मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम .
Image

बारामती ! आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव निंबाळकर मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम .

प्रतिनिधी –

वटवृक्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून, आषाढी एकादशीचे औचित्य साधत,वडगाव निंबाळकर येथील स्वातंञ्य विद्या मंदिर प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी,श्री नवनाथ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रोहन खोमणे व जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

दरम्यान या फाऊंडेशनच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यावेळी आषाढी एकादशीचे औचित्य साधून,वड,बेल,चिंच,कडुलिंब,पिंपळ आदी प्रकारची १०० झाडे लावण्यात आली आहेत. दरम्यान, वृक्षारोपण केलेल्या झाडांना,’वटवृक्ष फाऊंडेशन’चे सदस्यांनी या झाडांचे पालकत्व स्वीकारले असून,या झाडांना पाणी देऊन चंगल्या प्रकारे निघा राखत आहेत .

यावेळी गणेश रांगोळे,अक्षय जाधव, पुष्कराज गायकवाड, सुमित भोसले,विशाल हिरवे,अथांग जाधव,अविनाश टेंबरे,रितेश हिरवे,ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र चव्हाण आदि फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026