बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी Hony सुभेदार मेजर ताराचंद मोतीराम शेंङकर (निवृत्त )यांची संघटनेच्या वतीने बिनविरोध निवड.

Uncategorized

  प्रतिनिधी.

कै.माजी अध्यक्ष बाळासाहेब शेंङकर यांच्या आकाली निधनाने अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती.
आजी माजी सैनिक संघटना कार्यक्षेत्रात अनेक समाजिक उपक्रम राबवित आसते.
संघटनेच्या माध्यमातून मॅरेथॉन,रक्तदान शिबीर,कारगिल दिन,स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन,गुणवंत यशस्वी विध्यार्थी सन्मान,पोलीस खात्यातील पदाधिकारी सन्मान,पत्रकार बंधू , ग्रामपंचायत स्थरावरील सरपंच पदाधिकारी निवङ तसेच समाजाला योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकांचा प्रोत्साहनार्थ मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात येते.
आजी माजी सैनिक संघटनेचे समाजाला मोठं योगदान राहीलं आहे.
पोलीस स्टेशन दरबारी जाणारे वाद, तक्रारी देखील संघटनेमुळे कमी झाल्या होत्या.बांधावरील वाद आसोत, रस्त्याचे वाद आसोत कायद्याला धरून सर्व वादाचे निराकरण आजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
ताराचंद शेंङकर यांच्यावर संघटनेने मोठी जबाबदारी दिली आहे.नक्कीच दिलेल्या विस्वासाला विस्वास पात्र राहून समाजहित ङोळ्यासमोर ठेवून काम करतील हिच अपेक्षा.
यावेळी संघटनेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय धावपट्टू व पुणे जिल्हा क्रिङा अधिकारी, जगन्नाथ लकडे कायदेशीर सल्लागार ॲङ गणेशराव आळंदीकर सैनिक संघटना, उपाध्यक्ष भगवानराव माळशिकारे साहेब, सचिव रामदास कारंङे व तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे जेष्ठ सैनिक राजाराम शेंडकर, मोहन शेंडकर, दत्तात्रय चोरगे, सर्व सदस्य आजी माजी पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते.