• Home
  • माझा जिल्हा
  • तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा मध्ये अजून दोन आरोपींवरती वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.
Image

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा मध्ये अजून दोन आरोपींवरती वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.

प्रतिनिधी.

 वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे काही दिवसांपूर्वीच पोस्को व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये अजून दोन आरोपींचा समावेश झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ती एकटी रस्त्याने चालत जात असताना तिला जबरदस्तीने आरोपी सुजित जाधव राहणार रामनगर यांने त्यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये ओढून स्कॉर्पिओ गाडीच्या काळ्या रंगाच्या काचा वर घेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर मी पोलीस आहे अशी खोटी बतावणी करून पोलीस असल्याचा खोटे आयडेंटी कार्ड तिला दाखवून तू जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी तुझ्या घरातील आई-वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादी यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे

आरोपी सुजित जाधव सध्या फरार झाला असून त्याच्या भाऊ अजित जाधव देखील एक वर्ष पासून सुमारे १६ ते १७ गुन्ह्यामध्ये फरार आहे आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
तसेच आरोपी यांने त्याच्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ मधून सोमेश्वर परिसरातील महाविद्यालय परिसरामध्ये मुलींची छेडछाड केल्याची व त्याचा पाठलाग करुन त्रास देत असल्याची व आरोपी सुजित जाधव हा आपल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी मधून रात्रभर बाहेर फिरुन गोरक्षक या नावाखाली हप्ते देखील घेतो अशी चर्चा देखील सोमेश्वर परिसरामध्ये दबक्या आवाजात चालू आहे सुजित जाधव व गणेश गायकवाड यांच्या वर पोस्को सह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुजित जाधव व त्याचा भाऊ अजित जाधव यांच्या घराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे पिडीता व त्याची कुटुंबीय घाबरून आहे परंतु पोलिसांनी पीडिता व पीडितेच्या
कुटुंबीयांना आम्ही तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देऊ व कायद्यातील तरतुदीनुसार तुम्हाला न्याय मिळवून देऊ, तुम्ही आरोपी यांना घाबरण्याचे कारण नाही असे आश्वासन दिले असल्याचे समजत आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे अशा विकृत विचारांच्या आरोपींवरती गृह विभागाने त्वरित कारवाई करून या आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी सोमेश्वर परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025