Image

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश.

प्रतिनिधी –

पुणे ग्रामीण जिल्ह्यात घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरुंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, भाडे करारनामा, ओळखपत्र आदींबाबतची कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करावीत, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.

ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांना घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल करण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरमालकांनी ही माहिती पोलीस ठाण्याला सादर करावी. भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला न दिल्यास घरमालक हे भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025