प्रतिनिधी.
श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय, निंबूत येथे दि.१८ जुलै २०२५ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मु.सा. काकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. मृणालिनी मोहिते मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्या व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांच्या हस्ते करण्यात झाले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक योगदान तसेच विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
विद्यार्थी प्रेमराज भंडलकर याने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यलेखनावर सखोल प्रकाश टाकला. विशेष आकर्षण ठरली ती अण्णाभाऊंची अजरामर छक्कड, “माझी मैना गावाकडे राहिली”, जी विद्यार्थ्यांना ऐकून या छक्कडमध्ये अण्णाभाऊंना अभिप्रेत असणारा अर्थ, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनाची ओळख, साहित्याचे सामाजिक महत्त्व, आनंद कशात शोधायचा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खुडे सर यांनी केले, तर आभार सूर्यवंशी सर यांनी मानले.
स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मनात अण्णाभाऊंच्या कार्याचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांची नवी प्रेरणा निर्माण झाली.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैय्या काकडे दे.उपाध्यक्षा मा. सौ.सुप्रियाताई पाटील व मा.श्री.भीमराव बनसोडे तसेच मानद सचिव मा. श्री.मदनराव काकडे दे. यांनी घेण्यात आलेल्या या विद्यालयातील उपक्रमाचे कौतुक केले.
