भारतीय पत्रकार संघ नेहमीच प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी : गणगे पाटील

Uncategorized

दौंड प्रतिनिधी:
भारतीय पत्रकार संघ नेहमीच
प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश गणगे पाटील यांनी व्यक्त केले.
दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयात भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाची आढावा बैठक तसेच पद्ग्रहन सोहळ्यासह पत्रकारांसाठी कार्यशाळा देखील मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीत पत्रकारांच्या हितासाठी राज्यात विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा देखील करण्यात आली.या दरम्यान पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना रमेश गणगे पाटील हे बोलत होते.ते पुढे म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी अदखलपात्र गुन्ह्याच्या नावाखाली प्रामाणिक पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जात आहे. परंतु अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्याहेतु प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी भारतीय पत्रकार संघ खंबीरपणे उभा आहे.त्यामुळे पत्रकारांनी घाबरून न जाता कायदा कलम समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.
यावेळी अनेक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान रमेश गणगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून दौंड तालुक्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल येथील तालुकाध्यक्ष सुभाष कदम यांचे देखील विशेष कौतुक त्यांनी केले.
याप्रसंगी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक अनिल सोनवणे लीगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव मामुन युनिव्हर्सिटी उझबेकिस्तानचे डेप्युटी डीन वसीम तांबोळी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बबन जाधव माजी नगरसेवक प्रेमसुख कटारिया स्वप्नीलशेठ शहा ऍड.अमोल काळे डॉ. राहुल जगदाळे डॉ. रोहन खवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभाष कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार तसेच उपस्थितांचे आभार जयदीप बगाडे यांनी मानले