प्रतिनिधी
सदोबाचीवाडी येथे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके सर यांचे मार्गदर्शनाखाली केळी समूह माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सदोबाचीवाडी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे ऋषिकेश कदम यांनी AI Sugarcane विषयी माहिती दिली. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर भेट देऊन पीक किड व रोग सर्वेक्षण पाहणी केली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री अप्पासाहेब झंजे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. उप कृषी अधिकारी श्री माने साहेब यांनी पिक विमा योजना, फार्मर आयडी, कृषि संवाद व्हाट्स आप चॅनेल व इतर योजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी घोडके उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांनी केले.