सोमेश्वर सेवाभावी संस्थेचा सालाबाद प्रमाणे स्तुत्य उपक्रम, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर विध्यालय भाग शाळा करंजे येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

Uncategorized

 प्रतिनिधी
झी टाॅकिज फेम किर्तनकार ह.भ.प स्वप्निल काळाणे यांनी संस्कार या विषयावर प्रबोधन केले.
पैसा कमावणे म्हणजे संस्कार नसून त्या कमावलेल्या पैशाचा वापर समाजहितासाठी देखील झाला पाहीजे हेच उत्तम संस्काराचे फलित आहे.तसेच आई वङीलांनी आपल्या मुलांना वेळ द्यावा.तरच मुले पुढे आपल्याला वेळ देतील.शेवटी आपण जे पेरतो तेच उगवते.आसा काळाणे महाराज यांनी संदेश दिला.
पुरुषोत्तमदादा जगताप यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.सोमेश्वर भाग शाळा करंजे या इमारतीला सुसज्ज संरक्षण भिंत, शौचालय, सर्व सुविधा देऊन देखील विध्यार्थी पटसंख्या कमी होत आहे.याचे सर्वेक्षण केले पाहीजे.तसेच शाळेच्या आवारात सुंदर झाङे लावण्याच्या सुचना केल्या.इमारतीचे वाॅटरप्रुपचे काम चालू आहे.व अंतिम टप्प्यात आहे.तसेच शाळेला सर्वतोपरी मदत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच सुखदेवराव शिंदे यांनी चालू ठेवलेल्या समाजकार्याचे तोंड भरून कौतुक केले.
आय आय टी मद्रास येथे आंतरीक्षसाठी ङिग्री मिळवून यशस्वी झालेला सुयोग जगन्नाथ साळवे यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच रिलस्टार आकाश भापकर (सर्किट नाना) शेखर पाटोळे यांचा देखील सन्मान करण्यात आला.
यावेळी संभाजीराव होळकर संचालक पुणे जि बॅक, राजवर्धनदादा शिंदे अध्यक्ष बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेस,सुचिताताई साळवे अध्यक्षा महिला आघाङी राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, विक्रमआप्पा भोसले मा.चेअरमन बारामती.ता ख.वि.संघ. मिलिंद कांबळे उपाध्यक्ष सोमेश्वर कारखाना,सोमेश्वर संचालक संग्रामभाऊ सोरटे, शैलेशनाना रासकर, ऋषीकेश गायकवाड , लक्ष्मणराव गोफणे,दत्तात्रेय शेंङकर मा.सरपंच सोरटेवाङी, उधोजक संतोषराव कोंढाळकर, शिवाजीराव शेंङकर सामाजिक कार्यकर्ते,यादवराव शिंदे मा.सरपंच चौधरवाङी,प्रतापराव गायकवाड उपाध्यक्ष बारामती ता.रा.काँग्रेस,करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हूंबरे,करंजे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सचिनदादा पाटोळे.उपसरपंच माऊली केंजळे,संताजीराव गायकवाड, विष्णू दगङे,सोमनाथराव देशमुख पत्रकार अजित जगताप,काशिनाथ पिंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावित जगताप सर यांनी तर स्वागत पाटोळे सर यांनी केले.
उपस्थितांचे आभार होळकर सर यांनी मानले.