करंजे येथे विविध उपक्रम साजरे करत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा.

Uncategorized

प्रतिनिधी.

सोमेश्वर पंचक्रोशी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील विधानसभा क्षेत्र प्रमुख बंटी उर्फ राकेश गायकवाड यांच्या सौजन्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध असणारे तीर्थक्षेत्र सोमायाचे करंजे या ठिकाणी जाऊन सोमेश्वराच्या चरणी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो व येणारा राजकीय काळ हा सुखाचा आणि यशाने भरलेला जाओ यासाठी त्यठिकाणी अभिषेक करण्यात आला.आणि त्या नंतर त्या मंदिराच्या आवारामध्ये साहेबांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केक कापण्यात आला.यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख उल्हास दादा शेवाळे साहेब यांचा आदर सत्कार सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव विपुल भांडवलकर यांनी त्या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन केला.त्या कार्यक्रमांमध्ये गाव मौजे मोढवे येथील निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट व चटई याचे वाटप करण्यात आले.तसेच गाव मौजे करंजे येथील शाळेमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.व वाघळवाडी येथील आश्रम शाळेमध्ये मुलांना भोजन देण्यात आले.त्याच वेळी नवनियुक्त जिल्हाप्रमुख उल्हास तात्या शेवाळे यांचा शिवसेना बारामतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या सर्व कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख उल्हास तात्या शेवाळे,शिवसेना जिल्हा संघटक ॲडव्होकेट राजेंद्र काळे,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे,जिल्हा समन्वयक भीमराव आप्पा भोसले,महिला आघाडी जिल्हा संघटिका ज्योतीताई गाडे,बारामती शिवसेना तालुकाप्रमुख निलेश भाऊ मदने,तालुका संपर्कप्रमुख आदिराज कोठाडिया,माजी तालुकाप्रमुख व बारामती शहर निरीक्षक विश्वास मांढरे, कनेरीचे सरपंच व विभाग प्रमुख सतीश अण्णा काटे, उपशहर प्रमुख राजेश शहा, समन्वयक राजेंद्र गलांडे, महिला आघाडीच्या तालुका संघटिका सुमिताताई खोमणे, उपतालुकाप्रमुख सुदाम गायकवाड,उपतालुका प्रमुख संभाजी शिंदे,विभाग प्रमुख भगवान गोफने,दादा दळवी,अविनाश कदम,एडवोकेट आदेश काळे,उपतालुका प्रमुख परेश भापकर,माळवाडी चे सरपंच आणि वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख दत्ता लोणकर,उपतालुका प्रमुख नितीन गायकवाड,करंजे गावचे उपशाखाप्रमुख दादा धुमाळ,संजय बोडरे व इतर असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर सर्व कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम विभागाच्या वतीने विधानसभा क्षेत्र प्रमुख बंटी उर्फ राकेश गायकवाड यांनी केले होते.यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास दादा शेवाळे यांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.व आगामी काळामध्ये शिवसेना संघटन व पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करून संघटना बळकट करावी असे सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले..