बबई बनसोडे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित.

Uncategorized

प्रतिनिधी.

आज निराशिवतक्रार ग्रामपंचायातीच्या वतीने  लोकशाहीर  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निंबूत येतील बबई केरबा बनसोडे यांना सामाजिक व साहित्य वाचन या योगदानाबद्दल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुनील आण्णा पाटोळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . बबई बनसोडे यांनी जवळपास आतापर्यंत 250 हून अधिक पुस्तकांचे वाचन केले आहे. बबई बनसोडे यांचा जन्म फलटण तालुक्यातील कांबळेश्वर या गावी झाला व लग्नानंतर त्या निंबूत येथे बनसोडे कुटुंबीयांच्या सून म्हणून आल्या. शेतीची प्रचंड आवड असणाऱ्या बबई बनसोडे जुनी सातवी शिकलेल्या आहेत. वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे अनेक वाडमय, कादंबरी, महापुरुषांच्या विचारांची पुस्तके यांनी वाचली आहेत विशेष बाब म्हणजे 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बबई बनसोडे बिगर चष्मा वाचन करतात.
यापूर्वी निरेतील युवा कार्यकर्ते सुनिल आण्णा पाटोळे यांनी आपल्या घरी सुमारे 11 वर्षापूर्वी आण्णाभाऊ साठे यांची जयंती सुरु केली मोजके मित्र घेऊन याची सुरुवात केली. गेल्या वर्षी सुनील आण्णा पाटोळे यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांचा वारसा पुढे चालवण्याचे कार्य दादासाहेब गायकवाड, कांताभाऊ राखपसरे, आणि मित्र परिवाराने या वर्षी त्यांच्या नावाने एक पुरस्कार देण्याचे नियोजन केले.
प्रशासकीय जयंती होत असताना हा पुरस्कार “” बबई केरबा बनसोडे “” यांना देण्यात आला.
यावेळी निरेच्या सरपंच तेजश्रीताई काकडे, उपसरपंच राजेशभाऊ काकडे, सदस्य अनिलआण्णा चव्हाण, राधाताई माने, सुनीलप्पा चव्हाण, आंनता शिंदे, अभि भालेराव, यांच्या सह दादासाहेब गायकवाड, अमोल साबळे, कांताभाऊ राखपसरे, भिवा वळकुंदे, अजितदादा जैन, टी. के. जगताप, महेश जेधे, बनसोडे परिवार, व नागरिक उपस्थित होते.
आज लोकमान्य टिळक, आण्णाभाऊ साठे व संविधान यांचे पूजन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.