• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! डीजे टाळून लोकोपयोगी उपक्रमांनी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी ; कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम .
Image

बारामती ! डीजे टाळून लोकोपयोगी उपक्रमांनी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी ; कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम .

प्रतिनिधी –

महापुरुषांच्या जयंतीला होणार डीजेचा दणदणाट टाळून कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन मित्र मंडळाने समाजोपयोगी कार्यक्रम करत अनोख्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली आहे.

मंडळाच्या वतीने कोऱ्हाळे बुद्रुक येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिद्धेश्वर हायस्कूल याठिकाणी शालेय साहित्यांचे वाटप केले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक वारुळे,माजी सरपंच रवींद्र खोमणे, ग्रामपंचायत सदस्य मोहन भगत, लालासो माळशिकारे, पोलीस पाटील शरद खोमणे, सचिन खोमणे, राहुल खोमणे, प्रसाद भगत उपस्थित होते.

त्यांनतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पोलीस ठाण्याला फ्लड लाईट भेट देण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, वडगाव निंबाळकर माजी सरपंच संजय साळवे यावेळी उपस्थित होते.

डीजेचा खर्च टाळून शैक्षणिक व लोकोपयोगी कामे करून जयंती साजरी केल्याबद्दल नवजीवन मित्र मंडळाचे अध्यक्ष ओम अडागळे, उपाध्यक्ष अमर अडागळे व मंडळातील कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026