प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यात सर्वत्र महसूल सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथे महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत विविध विषयांवरती श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर , वडगाव निंबाळकर सरपंच सुनील ढोले, उपसरपंच संगीताभाभी शहा , वडगाव निंबाळकर माजी सरपंच संगीताराजे राजेनिंबाळकर, सदोबाचीवाडी सरपंच मनिषा होळकर , कोऱ्हाळे खुर्द सरपंच पवार, बारामती पंचायत समिती गटविकास अधिकारी किशोर माने , बारामती नायब तहसीलदार नामदेव काळे हे होते .
या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर मंडल व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले होते . सर्व नागरिकांनी या शिबिरामार्फत कागदपत्रासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर त्याचे निरासन करून सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे वडगाव निंबाळकर मंडळ अधिकारी गजानन पारवे यांनी संबोधले. मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, महा-ई-सेवा केंद्र चालक, व संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावकरी व नागरिकांचाही मोठा सहभाग या शिबिरात होता.
या भरवलेल्या शिबिरामध्ये जातीचा दाखले, डोमासाईल व इतर शैक्षणिक दाखले ,शिधा पत्रिका, संजय गांधी व श्रावण बाळ योजना ,पंचायत समितीच्या विविध योजना, कृषी विभागाच्या योजना ,महिला व बाल विकास विभागाच्या योजना ,शिक्षण विभागाच्या योजना, जिवंत ७/१२, भूमि अभिलेख विभागाच्या योजना, नवीन आधार कार्ड व दुरुस्ती, आरोग्य विषयी नेत्र तपासणी व रक्त तपासणी,पशुधान विभागच्या विविध योजनांचा लाभ, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी याप्रकारे एकूण पंधरा गावातील ९१५ नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेऊन त्यांचे कागदपत्र काढून माहिती देण्यात आली.
यावेळी निलेश मदने , संतोष होळकर , नानासाहेब मदने , सचिन साठे , सुनील खोमणे , जितेंद्र पवार , निलेश साळवे, दत्तात्रय खोमणे , आदी ग्रामस्थ उपस्थित होते . या शिबिरामुळे नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यास मदत झाली असून शासनाच्या सेवा गावागावात पोहोचवण्याचा महत्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पार पडला.