जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांची निर्मिती करून वापर वाढवावा – डॉ राहूल कदम यांचे आवाहन

Uncategorized

प्रतिनिधी

अफार्म पुणे आणि कार्ड जालना च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळावा.धामणगाँव. दिनांक 23 डिसेंबर रोजी धामणगाँव ता.बदनापूर येथे अफार्म पुणे आणि सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (कार्ड), जालना यांच्या संयुक्त विद्यमाने अफार्म चे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी,प्रकल्प संचालक एस.एन.साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवामानानुकुल – अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रोत्साहन अभियान अंतर्गत राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून धामणगाँव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ राहूल कदम यांनी मार्गदर्शन करताना म्हंटले की,अधिक उत्पादन वाढवता यावे यासाठी शेतकरी गरज नसताना सुद्धा मोठया प्रमाणावर रासायनिक खते,औषधे वापतात त्यामूळे उत्पादन खर्च वाढतो परंतु उत्पंन वाढत नाही. यावर मात करण्यासाठी जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी आपल्या शेतातील पिकांची हंगाम संपल्यानंतर जे काही बीकामी अवशेष न जाळता त्यापासुन सेंद्रिय खतांची निर्मिती करून त्याचा वापर वाढवावा जेणेकरून सुपीकता वाढल्याने पिकांवर गरज नसताना खर्च करण्याची पडणार नाही. यांसाठी सेंद्रीय खत निर्मिती चे विविध प्रकारचे प्रयोग करून ते शक्य आहे असे प्रतिपादन केले आहे.

तर डॉ सचिन धांडगे यांनी पीक लागवडीच्या विविध पद्धती,पीक नियोजन व वाणांचा वापर, रुंद सरी वरंबा यंत्राने पेरणी,पीक वाढीच्या अवस्था आणि सिंचन व्यवस्थापन, सुधारित चारा निर्मिती पद्धती ज्यात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती,ॲझोला निर्मिती,मूरघास (सायलेज) निर्मिती चा वापर करून आपण जमिनीच्या काळजी घेऊन पीक उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन वाढवता येईल असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ सचिन धांडगे यांनी यावेळी केले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ राहूल कदम,डॉ सचिन धांडगे, सरपंच तुकाराम चव्हाण,पोलीस पाटील काकासाहेब खैरे कार्ड चे सचिव पुष्कराज तायडे,कृषी तंत्रज्ञ अजय राठोड,ग्रामसेवक भरत मुरमे,कृषी सहाय्यक राजु राठोड, ग्राम रोजगार सेवक मुरलीधर राठोड,दादाराव साळवे यांची प्रमूख व्यक्तीसह अल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी यांची मोठया संख्येने उपस्थीती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्ड संस्थेचे आणि ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.