• Home
  • माझा जिल्हा
  • लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
Image

लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

प्रतिनिधी.

: महाराष्ट्र राज्यातील एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाचा प्रादूर्भाव अत्यल्प आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार, कीटक नियंत्रण व जनजागृती मोहीम सुरू असून पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

लंपी चर्मरोगाने राज्यातील ९ हजार ८२० पशुधन बाधित असून ६ हजार ६१८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर आतापर्यंत ३३९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनामार्फत तात्काळ व प्रभावी नियंत्रण उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. राज्यात ९३ टक्के पेक्षा जास्त गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

केंद्र शासनाकडील मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात गोट पॉक्सची विजातीय उत्तरकाशी स्ट्रेन लस दिली जात असून त्याचा परिणाम होऊन रोग प्रादूर्भाव कमी झाले आहेत. लंपी रोग प्रतीबंधक सजातीय लस वापरली गेली तर रोग नियंत्रणाकरीता अधिक परिणामकारक होईल. त्यामुळे या पुढील काळात लंपी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लंपी चर्म रोग प्रतिबंधात्मक लस निर्मितीचे तंत्रज्ञान भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अॅग्रीइन्नोवेट इंडिया या कंपनीकडून उपलब्ध करून घेतले असून त्यामुळे पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे या पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय संस्थेमध्ये व्यावसायिक तत्वावर लसनिर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्य लंपी चर्म रोगावरील लस उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होवून राज्यातील १०० टक्के गोवर्गीय पशुधनास दरवर्षी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे शक्य होणार आहे.

पशुसंवर्धन विभागाने या रोग प्रादुर्भावाचा साथरोग विषयक अभ्यास करुन रोग प्रतिबंधक लसीकरणाचा समावेश मान्सून पूर्व लसीकरण कार्यक्रमामध्ये केला आहे. या करिता ११९ लक्ष लस मात्रा व अनुषंगिक साहित्याचा पुरवठा पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात आला आहे. लंपी चर्म रोगाबाबत पशुपालक तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025