बारामती! वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

Uncategorized

 .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

आज १५ ऑगस्ट २०२५ आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष पूर्ण झाले .या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण भारत देशात अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो यानिमित्ताने वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक , वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, तलाठी अधिकारी, मंडल अधिकारी, कृषी अधिकारी ,महावितरण अधिकारी , व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील शासकीय अधिकारी देखील या कार्यक्रमावेळी उपस्थित होते .

वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेचे विद्यार्थी यांच्या वतीने स्काऊट गाईड परेड करून मानवंदना देण्यात आली. यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत यांच्या वतीने अपंग व्यक्तींना पालकत्व जे करत आहे अशा पालकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले व देशाला आज ७९ वर्ष पूर्ण झाले यावर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आपले मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील ढोले यांच्या वतीने करण्यात आले . या कार्यक्रमाचे वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले .