राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मु. सा. काकडे महाविद्यालयात विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन 

माझा जिल्हा

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन २८ व २९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते. क्रीडास्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व मेजर ध्यानचंद ट्रॉफीचे अनावरण करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना खेळाच्या जास्तीत जास्त सुविधा पुरविल्या जातील तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकाने दररोज एक तास व्यायाम केला पाहिजे व स्वस्थ भारत घडविण्यासाठी विशेष योगदान दिले पाहिजे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो त्याचबरोबर नोकरीमध्ये उच्चपदावर चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी खेळ, शारीरिक शिक्षण याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे सांगून सर्वांनी एक तास मैदानावरती घालवावा व तसेच विद्यार्थ्यांनी जिमखाना विभागाला भेट देऊन महाविद्यालयात क्रीडा सुविधा व जिम पहावी असे आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले.

          या स्पर्धेमध्ये ३०० पेक्षा अधिक मुलामुलींनी सहभाग नोंदविला क्रीडास्पर्धांमध्ये इनडोअर खेळामध्ये रस्सीखेच, बुद्धिबळ, मनोरंजक खेळांमध्ये दोरीउड्या, ब्लॅक चॅलेंजेस अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मैदानी खेळामध्ये व्हॉलीबॉल, खो – खो, क्रिकेट व धावणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी राष्ट्रीय क्रीडादिन हा मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर साजरा केला जातो असे सांगून मेजर ध्यानचंद हे देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान आहे असे सांगितले. संस्थेचे सचिव श्री. सतीश लकडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व खेळाडूंनी खेळ भावनेने खेळ खेळण्यास आव्हान केले. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांनी राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे देशमुख यांनी राष्ट्रीय क्रीडादिनाच्या शुभेच्छा संदेशामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्या असे सांगून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

       क्रीडास्पर्धेनिमित्त आयोजित क्रीडास्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :

 १) व्हॉलीबॉल

    विजयी – कला शाखा

  उपविजेयी – बी.बीए. सीए शाखा

२) क्रिकेट

 विजयी – कला शाखा

उपविजयी – बीबीए सीए शाखा

३) योगा

विजयी – बीबीए सीए

उपविजयी – कला शाखा

४) व्हॉलीबॉल –

मुले विजयी – विज्ञान शाखा

उपविजयी – बीबीए सीए शाखा

५) रस्सीखेच

मुले विजेता – बीबीए सीए शाखा

उपविजेता – कला शाखा

६) प्लँक चॅलेंजेस

मुले विजेता – बीबीए सीए शाखा

७) रस्सीखेच

 मुली विजेता- कला शाखा

उपविजेता – बीबीए सीए शाखा

८) दोरीउड्या

मुले विजेता – बीबीए सीए शाखा

९) प्लँक चॅलेंजेस

मुली विजेता – कला शाखा

उपविजेता – विज्ञान शाखा

१०) मैदानी खेळ

 विजेते मुले – कला शाखा

उपविजेते – वाणिज्य शाखा

मैदानी खेळ मुली विजेते – कला शाखा

११) दोरीउड्या

मुली विजेता – विज्ञान शाखा

उपविजेता – बीबीए सीए शाखा

३६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद कला शाखेने मिळवले व ३५ गुणांसह बीबीए सीए शाखेने उपविजेतेपद मिळवले १३ गुणांसह विज्ञान शाखेने तृतीय क्रमांक मिळवला. ८ गुणांसह वाणिज्य शाखेने चतुर्थ क्रमांक मिळवला. प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विजेत्याचे विशेष कौतुक केले तसेच ३६ गुणांसह कला शाखेने सर्वसाधारण विजेतेपद मिळवल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करून व ध्यानचंद ट्रॉफी देऊन कला शाखेला गौरविण्यात आले.

       या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे एन सी सी विभागप्रमुख, प्रा. दत्तराज जगताप, प्रा. डॉ. संजू जाधव IQAC समन्वयक, प्रा. रजनीकांत गायकवाड बीबीए सीए विभाग प्रमुख, व श्री.अदित्य लकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.