प्रतिनिधी – सुभाष जेधे
निरा (ता. पुरंदर )… दिनांक 08/09/2025 रोजी निरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष जेधे आणि धमाका महिला ग्रुपच्या संस्थापक व मा. अध्यक्षा सौ तनुजाभाभी मनोज शहा व अध्यक्षा सौ नेहा नवेंदू शहा, तसेच सौ मोहिनी दत्तात्रय भिसे यांचे सुरेख सूत्रसंचालन सर्वांनां प्रेरित करून हा कार्यक्रम यशस्वी करताना सर्वांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा व प्रसिद्ध कायदे विशारद सौ सुप्रियाताई विशाल बर्गे, अखिल भारतीय मराठा महासंघ महिला अध्यक्षा बारामती तालुका, श्री विक्रमबाबा पवार सरचिटणीस पुणे जिल्हा अ. भा. मराठा महासंघ, सौ सोनमताई राहुल मोरे अध्यक्षा समर्थ दृष्टी सोशल फौंडेशन, सौ रत्नाताई सुरेश पिंगळे देशमुख अध्यक्षा राजमाता जिजाऊ महिला संस्था ( महाराष्ट्र राज्य ), विशालजी बारसुडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अ. भा. मराठा महासंघ, सौ तनुजाभाभी मनोज शहा अध्यक्षा धमाका महिला ग्रुप व पुणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा ) पक्ष, दत्ताआबा चव्हाण मा. आरोग्यबांधकाम सभापती पुणे जि. प. पुणे, विराजभैय्या काकडे सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती, सौ तेजश्रीताई विराज काकडे सरपंच ग्रामपंचायत निराशिवतक्रार, श्री राजेशभाऊ काकडे उपसरपंच निराशिवतक्रार, विरोधी पक्षनेता व सदस्य अनिलआण्णा चव्हाण, राजेश चव्हाण संस्थापक अध्यक्ष समर्थ सह. पतसंस्था निरा, अमोल साबळे आरपीआय ( ए ) पुणे जिल्हा अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व निरा शहर अध्यक्ष अजितदादा राष्ट्रवादी पक्ष प्रमोद काकडे, भाजप पक्षाचे योगेंद्र आण्णा माने, बौद्ध महासभा प्रसारक दादासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ मोरे, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे संतोष मोहिते, मा. उपसरपंच कल्याणतात्या जेधे, अकबर सय्यद, पत्रकार रामदास राऊत, उद्योजक विलास बापूराव धायगुडे, शिवसेना ( शिंदे गट) दयानंद चव्हाण, आमच्या आदमी पक्षाचे विजय दत्तात्रय धायगुडे, आमच्या आदमीचे महेश आण्णा जेधे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यमाचे सूत्रसंचालन सौ नेहाभाभी नवेंदू शहा व सौ मोहिनी दत्तात्रय भिसे यांनी केले यामध्ये एकूण 17 पुरस्कार देण्यात सर्व मान्यवराच्या शुभहस्ते देण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांमध्ये रेखा सदाशिव पवार, शांतबाई बबन झगडे, शैलजा चंद्रकांत बेलसरे, मंगलताई पाटील, पदमजा अजित लाहोटी, सुमन विठ्ठल मोहिते, सुरेखा तुकाराम वीरकर, संगीता तुळशीराम जगताप प्रतिमा प्रफुल्लकुमार होरा, अश्विनी लिलाधर मंदकनल्ली, संगीता दत्तात्रय शिंदे, सुहासिनी लक्ष्मणराव चव्हाण, मंगल उत्तमराव आगवणे, सपना संतोष माने, व खास पुरस्कार कु. अलिशा नवेंदू शहा हिला प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली सौ रत्नाताई सुरेशराव पिंगळे यांनी सुभाष जेधे माझे बंधू आम्ही दोघेही रागीट असल्यामुळे आमच्यात नेहमी वाद होतात पण कटूता अजिबात नाही त्यांच्या एका फोनवर मी निरेत आले व माझा यतोचित सन्मान केल्याने मी सुभाषदादा जेधे व त्यांचे सहकारी तसेच धमाका ग्रुपचे धन्यवाद मानते यावर सर्वांची मने त्यांनी जिंकली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ सुप्रियाताई बर्गे यांनी अनेका विषयांवर ती महिलांना मार्गदर्शन केले.