प्रतिनिधी –
ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने बारामती येथे मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी लोकहित प्रतिष्ठान तर्फे भिगवन चौक येथे मशहूर कव्वाल हाजी सुलतान नाझा यांच्या कव्वालीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी नेत्रदीपक स्टेज सजवण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर (बा.न.प.) व बारामती नगरीचे मा. नगराध्यक्ष सुभाषशेठ सोमाणी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमास मा. नगरसेवक अभिजित काळे, मा. नगरसेवक जयसिंग (बबलू भैया) देशमुख, मा. नगरसेवक हाजी अमजद बागवान, सोहेल शेख(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश, तांबोळी जमात बारामती अध्यक्ष मुनीर तांबोळी, समाजसेवक श्री सिद्धनाथ भोकरे, अजीज शेख (मा. शिक्षण मंडळ सदस्य बा.न.प.), समाजसेवक अझर शेख, योगेश महाडिक, गौरव अहिवळे,सय्यद भाऊसाहेब तसेच इतर मान्यवर, पत्रकार सोमनाथ कवडे, संतोष जाधव, मोईन बागवान, सुरज देवकाते, उपस्थित राहून सदिच्छा व्यक्त केल्या.
बारामतीकरांनी प्रथमच ईद मिलादुन्नबी निमित्त अशा कव्वाली कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या यशस्वी कार्यक्रमासाठी अस्लम तांबोळी, जावेद शेख, हाजी इम्रान शेख, शब्बीरभाई पठाण, समद शेख, परवेज शेख, अमीर तांबोळी, वसीम शेख, जमीरभाई इनामदार आणि लोकहित प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले.