पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सिंह दत्तक – सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टचा उपक्रम

Uncategorized

प्रतिनिधी.

पुणे : “सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि भारतही लवकरच जगाचा राजा होईल” या भावनेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयातील सिंहांना सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट तर्फे दत्तक घेण्यात आले आहे. याअंतर्गत एक महिन्याचा खाणे, पिणे व औषधोपचाराचा संपूर्ण खर्च ट्रस्ट उचलणार आहे.

ट्रस्टचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री प्रकाश भाऊ शिंदे यांनी सांगितले की, “वाढदिवसानिमित्त फक्त फ्लेक्स, आतषबाजी वा दिखाव्यावर खर्च करण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजोपयोगी कामातून आनंद साजरा करणे ही खरी सेवा आहे. त्यामुळे आम्ही सिंह दत्तक घेण्याचा संकल्प केला.”

या उपक्रमासाठी कात्रज उद्यानाचे संचालक राजकुमार जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अशा पद्धतीचा आगळावेगळा उपक्रम राबवल्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.