प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील चोपडज येथील अझरुद्दीन बशीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)अल्पसंख्यांक विभाग प्रदेश संघटक सचिव पदी नेमणूक करण्यात आली आहे. अझरुद्दीन यांच्या कार्याला पाहून त्यांचे काम तळागळा पर्यंत जाऊन सर्व गोर गरीब लोकांची मदत व सहकार्य करणे हे कार्य पाहून अल्पसंख्यांक विभाग प्रदेश संघटक सचिव हे पद त्यांना देण्यात आले असल्याचे चोपडज ग्रामस्थांकडून सांगण्यात आले . सदर निवड पत्र आमदार इद्रिस नायकवडी राज्यप्रमुख अल्पसंख्यांक विभाग यांनी अझरुद्दीन तांबोळी यांना दिले आहे.
पुणे पिंपरीचिंचवड या ठिकाणी जनसंवाद कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अझरुद्दीन तांबोळी यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांचे विचार तळागाळापर्यंत विशेषता अल्पसंख्यांक समाजात पोहोचवण्याचे काम यापुढे करणार आहे.तसेच येथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघटन व पक्ष वाढीसाठी कार्य करणार असल्याचे तांबोळी यांच्याकडून सांगण्यात आले.