साहेबराव दादा विविध कार्यकारी विकास सोसायटीची 114 वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.

Uncategorized

प्रतिनिधी.

नींबूत येथील साहेबराव दादा विविध कार्यकारी विकास सोसायटीची 114 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नींबूत येथे बाबा कमल हॉल या ठिकाणी आज सकाळी साडेनऊ वाजता पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश भैय्या काकडे यांना करण्यात आले. सुचक राजकुमार बनसोडे. अनुमोदक संभाजी काकडे
सभेपुढील  विषयाचे प्रोसिडिंग संस्थेचे सचिव योगेश काकडे यांनी वाचन केले.
यावेळी संस्थेच्या नफ्यातून संस्थेच्या सभासदांकरता 4% डीव्हीडंट वाटप करणार असल्याचे चेअरमन अजित सर्जेराव काकडे यांनी जाहीर केले.
सभेपुढील अनुक्रमे 1ते 11 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. राजकुमार बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या सभासदांसाठी उसाचे टणीच कसे वाढेल या संदर्भात मेळावा आयोजित करावा अशी सूचना मांडली.यावेळी अध्यक्ष यांनी आपल्या भाषणामध्ये सभासदांनी वेळेत कर्ज भरावे असे आवाहन केले. सभासदांनी  इतर ठिकाणी ठेव न ठेवता आपल्याच संस्थेमध्ये ठेवू ठेवावे असे देखील आवाहन काकडे यांनी केले. भविष्यामध्ये  सोसायटीची ओळख स्वावलंबी सोसायटी म्हणून निर्माण व्हावी अशी अपेक्षा अध्यक्ष यांनी व्यक्त केली. ऐन वेळच्या विषयामध्ये सभासदांनी औषध फवारण्यासाठी ड्रोन खरेदीची सूचना मांडली यावेळी सभेच्या अध्यक्षांनी संस्थेचे चेअरमन संचालक मंडळ यांना ड्रोन खरेदी करणे बाबत विचार करण्यास सांगितले.  यावेळी आभार भीमराव बनसोडे यांनी मानले