Image

सोमेश्वरच्या सभासदांच्या खात्यावरती अंतिम बिल जमा.

प्रतिनिधी.

गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी कारखान्याकडे गळीतासाठी पुरविलेल्या ऊसाचे अंतिम बील रु.२२६/- प्रती टन प्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणेत आलेले आहे. त्याचप्रमाणे पुर्व हंगामी ऊसासाठी रु.७५/- व सुरु व खोडवा ऊसाकरीता रु.१५०/-प्र.टन याप्रमाणे अनुदानाची रक्कम सभासदांच्या खात्यावर यापुर्वीच जमा करणेत आलेली आहे. अनुदानाची रक्कम विचारात घेता कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना पुर्व हंगामी ऊसासाठी रु.३४७५/- व सुरु आणि खोडवा ऊसासाठी रु.३५५०/- प्रती टन याप्रमाणे अंतिम ऊस बील आदा करणेत आलेले आहे. प्रती टन रु.२२६/- प्रमाणे निघणारी रक्कम सुमारे रु.२५.०० कोटी आज रोजी सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सभासदांच्या कारखान्याकडे असलेल्या ठेवी वरील व्याजाची रक्कम सुमारे रु.४.०० कोटी बँक खातेवर जमा करणेत आलेली आहे. तसेच सदर हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या गेटकेन ऊस उत्पादकांसाठी अंतिम ऊस बील रु.२६/- प्रमाणे त्यांचे बँक खात्यावर जमा करणेत आलेले असून गेटकेन धारकांना एकूण रु.३२००/- प्र.टन प्रमाणे अंतिम दर देणेत आलेला आहे. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील बिगर सभासद व उत्पादक सभासद यांनी पुरविलेल्या ऊसासाठी अनुदानासह रक्कम रु.३४५०/- आणि गेटकेनसाठी रु.३२००/-प्रमाणे संपुर्ण रक्कम आज रोजी आदा केलेली आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025