सतीश भैय्या कल्याणकारी संघाने आयोजित केलेली आणि माननीय श्री सतीशराव शिवाजीराव काकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली संकल्प यात्रा 2025

Uncategorized

प्रतिनिधी.
काशी अयोध्या दिनांक 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान टप्प्याटप्प्याने पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गंगा पूजन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयच्या प्रांगणामध्ये संपन्न झाले.
या कार्यक्रमास माननीय सतीश भैय्या काकडे देशमुख( अध्यक्ष सतीश भैय्या कल्याणकारी संघ), माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सविताताई काकडे देशमुख, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक माननीय अभिजीत भैय्या काकडे देशमुख , निंबूत ग्राम विकास प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका माननीय तेजस्विनी ताई काकडे देशमुख तसेच सतीश भैय्या कल्याणकारी संघाचे सचिव माननीय मदनभैय्या काकडे देशमुख उपस्थित होते. *काशी अयोध्या संकल्प यात्रा मा.सतिश भैया यांनी स्व खर्चातून घडवल्या आहेत.त्यांच्यात असणाऱ्या दानशूरवृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन समस्त निंबूत गावकऱ्यांना घडले .* या संकल्प यात्रेमध्ये निंबुत गावातील आणि परिसरातील 506 महिलांचा समावेश होता. गंगापूजन निमित्त सर्व महिला आपल्या कुटुंबीयांसोबत उपस्थित होत्या.
या संकल्प यात्रेची सांगता गंगापूजनाने करण्यासाठी तिन्ही टीमचे प्रमुख मदन भैया काकडे देशमुख, रुपेश काकडे देशमुख आणि विक्रम काकडे देशमुख त्याचबरोबर सर्व स्वयंसेवक यांनी नियोजनबद्ध आखणी केली होती.
निंबुत गावातील चंद्रकांत केंजळे काका तसेच नारायण मिश्रा काका यांच्या मार्गदर्शनातून सामूहिक गंगा पूजन , सत्यनारायण महापूजा, करण्यातआली. या पूजेदरम्यान माननीय सविताताई आणि तेजस्विनी अभिजीत काकडे यांनी सर्व महिलांच्या भेटी घेऊन विचारपूस केली.
गंगा पूजनाचा विधी झाल्यानंतर काशी आणि अयोध्या या संकल्प यात्रे मध्ये सहभागी असणाऱ्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. व काशी अयोध्या यात्रेदरम्यान आलेले आपले अनुभव कथन केले.यामध्ये दिपाली ननावरे( मॅडम), शुभांगी काकडे शितल लकडे, राणी शिंदे, उषा पवार, दीप्ती काकडे ,मंगल आगवणे(मॅडम), ज्योती नवले यांनी मा. सतीशभैय्या काकडे देशमुख यांच्या बद्दल आस्था आणि आदर व्यक्त केला. तसेच ते करत असणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची दखल घेतली. टीम प्रमुख मदनभैय्या काकडे आणि स्वयंसेवक आदिनाथ गायकवाड यांनी यात्रा व्यवस्थापनात व संपूर्ण प्रवासात आलेले अनुभव व्यक्त केले.
प्रमुख उपस्थितीच्या मनोगतांमध्ये माननीय श्री अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांनी पुढील काळामध्ये महिलांना द्वारका दर्शन यात्रा घडवून आणण्याचा तसेच माननीय सतीश भैय्या काकडे देशमुख यांनी महिलांना यात्रेनिमित्त विमान प्रवास घडवून आणण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने 1800 भाविकांना रुचकर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . एकत्र कार्यक्रम घेतल्यामुळे गावातील सर्वच महिलांना गंगापूजन यथोचित करता आले, महिलांना या कार्यक्रमामुळे अतिशय समाधान मिळाले. महिलांनी माननीय सतीशभैय्या काकडे यांचे आभार व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सुत्र संचालन पत्रकार श्री मधुकरजी बनसोडे यांनी केले.तर
आभार मा.अभिजीतभैया यांनी मानले.