सोमेश्वर दुकान लाईनच्या व्यावसायिकांचा आक्रोश.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून काही व्यवसायिक आपले पोट भरण्याकरिता व्यावसाय करीत आहेत त्या ठिकाणी कारखान्याकडून कारखान्याच्य जागेमध्ये दोन-तीन दिवसापूर्वी चैनल उभे केले व आज त्या ठिकाणी पत्रा बसवण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांना मिळाली मात्र स्थानिक व्यावसायिकांनी या गोष्टीचा तीव्र विरोध केला काही व्यवसायिकांशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधल्यानंतर व्यावसायिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आम्ही गेल्या 50 ते 60 वर्षांपासून या ठिकाणी आमचा प्रपंच करीत आहोत जर आमच्या दुकानाच्या समोर पत्रा ठोकला गेला तर आमच्या दुकानांमध्ये ग्राहक येण्यासाठी जागा राहणार नाही कारखाना प्रशासनाकडून आमची गळचेपी करण्याचं काम चालू असल्याची माहिती व्यावसायिकांमधून मिळाली यावेळी बोलताना महिलांनी अजित पवार यांना विनंती केली की आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत दादा तुम्हीच आता काहीतरी करा आणि तुमच्या लाडक्या बहिणींचा प्रपंच वाचवा अशी भावनिक साध स्थानिक महिलांनी अजित पवार यांना केली यावेळी सोमेश्वर कारखान्याच्या सुरक्षा विभागाकडून 25 ते 30 सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते तर पोलीस प्रशासनाकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावरती कारखाना प्रशासनाने आमचा शिमगा करू नये अशी देखील भावना यावेळी बोलताना व्यवसायिकांनी व्यक्त केली