वडगांव निंबाळकर गणातून बारामती पंचायत समिती साठी मा.राकेश उर्फ बंटी गायकवाड इच्छुक शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकर) पक्षातून उमेदवारी घेऊन प्रस्थापितांना शह देण्यासाठी जनता नक्कीच साथ देईल अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. मागील पाच वर्षांपासून विकास कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचे विरोधात विविध वेळा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे.. बारामती तालुक्यातून माननीय अजित पवार या आपल्या तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या निधी उपलब्ध करत असतात परंतु निधी उपलब्ध झाल्यानंतर या निधीच्या माध्यमातून जो विकासाचा गवगावा केला जातो ते पाहता विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजली असून या भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी या प्रभागामध्ये विरोधी पक्षाची ठाम भूमिका आणि बंटी गायकवाड यांनी पार पाडले आहे.तसेच प्रशासन दरबारी याबाबतीत अनेक वेळा पक्षाच्या माध्यमातून व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.परंतु विरोधी पक्षांमध्ये काम करत असताना तालुका पातळीवर प्रतिनिधित्व मिळावं आणि या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे एक वाक्य या ठिकाणी त्यांनी उद्रृत केले की देशात जर लोकशाही टिकवायचे असेल तर विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. त्याच पद्धतीने तालुका पातळीवर असेल,गाव पातळीवर असेल,जिल्हा पातळीवर असेल किंवा राज्यपातळीवर असेल विरोधी पक्ष सक्षम असला तर सत्ताधाऱ्यांना लोकशाहीच्या चाकुरीमध्ये काम करून घेण्याचा व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत असतो. आणि त्यामुळे लोकशाहीचा समतोल राखला जातो.. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.म्हणून या गणातून सर्वसामान्य जनतेने मला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी.आणि विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यासाठी व आपले जनतेचे प्रश्न प्रशासन दरबारी मांडण्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्यावी असं आवाहन त्यांनी जनतेला केले. पक्ष फुटी होत असताना ठामपणे विचारांसोबत राहिलेले राकेश गायकवाड यांनी पक्ष मजबुतीसाठी तालुक्यामध्ये अनेक तरुणांशी संवाद साधून पक्षासाठी काम केल्याचे देखील अनेकांकडून बोलले जाते