• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित “आम्ही बारामतीकर ” या दिपावली अंकाचा प्रकाशन सोहळा व कविसंमेलन को-हाळे येथे ऊत्साहात संपन्न.
Image

बारामती! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित “आम्ही बारामतीकर ” या दिपावली अंकाचा प्रकाशन सोहळा व कविसंमेलन को-हाळे येथे ऊत्साहात संपन्न.

वडगाव निंबाळकर प्रतिनिधी –

पंचक्रोशी प्रकाशन होळच्या वतीने बारामती तालुक्यातील कवि-कवयित्री एकत्र करुन बारामतीची एक आगळी वेगळी ओळख करुन कविवर्य मोरोपंताची बारामती हि ख-या अर्थाने साहीत्य पंढरी आहे हे सिद्ध केले. हा कार्यक्रम सिद्धिविनायक मंगल कार्यालय कोऱ्हाळे येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सुप्रसिध्द गझलकार प्रमोदजी जगताप हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाट्यपुस्तकातील लेखीका व अभिनेत्री अंजली अत्रे व महाराष्ट्र राज्य पाट्यपुस्तक निर्मीती मंडळ, पुणे येथील मा. विषेशाधिकार श्री मोगल जाधव तसेच सुप्रसिध्द रानकवी लक्ष्मणजी शिदे व सुनंदा कर्चे हे ऊपस्थीत होते.

‘ आम्ही बारामतीकर ‘ या अंकांचे प्रकाशन सिद्धीविनायक ऊद्योग समुहाचे अध्यक्ष ह.भ.प दत्तात्रय गावडे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर बोलले की साहीत्यीक कार्यक्रमासाठी कसलाही निधी कमी पडु दिला जाणार नाही, जेष्ट साहीत्यीक प्रा.रविंद्र. कोकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये कविसम्मेलन वा साहीत्यीक कार्यक्रम का असावा, कसा असावा, तसेच वाचन चळवळ का असावी कोकरे यांनी समर्पक मार्गदर्शन केले.

कवि संमेलनामध्ये बारामती पंचक्रोशीतील एकुन ७६ सारस्वंतानी आपल्या कविता सादर केल्या. यात प्रामुख्याने हनुंमत चांदगुडे, सोमनाथ सुतार, अभिमन्यु भगत, सोपानराव आठोळे. संजय मोरे.द.सु भोसले, वनिता जाधव, सुजाता शिंदे, संगीता देशमुख, स्वाती सोरटे.संध्या सातपुते, ऊर्मिला झगडे,कांतीका वसेकर, निलीमा सोरटे आम्रपाली धेंडे, इंदुमती गायकवाड स्वाती केंजळे, सुरेखा गायकवाड इत्यादींनी आपल्या कविता सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली. निवेदक म्हणुन शब्दसम्राज्ञी जयश्री माजगावकर व कविवर्य राहुल शिंदे यांनी सुत्रबद्ध सूत्र संचालन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेवटी कार्यक्रमाच्या कार्यवाहक अलका रसाळ यांनी ऊपस्थीतींताचे आभार मानले .

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025