प्रतिनिधी
निरा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविल्याने कार्यक्रमाला भव्यता प्राप्त झाली.
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घाडगे, फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण, तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन-संचालक, वाठार जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी तसेच हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. नागरिकांचा झालेला हा प्रचंड प्रतिसाद भोसले यांच्या कार्याबद्दलचे प्रेम व विश्वास अधोरेखित करणारा ठरला.
शिवसाई मंगल कार्यालयात आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा निनाद, वारकरी ढोल ताशा पथकाचा जलद नाद आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या जयघोषामुळे वाढदिवस सोहळा उत्सवमय वातावरणात पार पडला.
राजेंद्र काका भोसले यांच्या सामाजिक बांधिलकी, मदतीचा हात आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे हा कार्यक्रम नीरासह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला.















