प्रतिनिधी.
सदोबाचीवाडी ता. बारामती येथे कृषि विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियान पौष्टिक कडधान्य योजनेअंतर्गत राज अग्रो शेतकरी गटास हरभरा बियाणे वितरित करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे सर , उप विभागीय कृषि अधिकारी तुकाराम चौधरी सर व तालुका कृषि अधिकारी श्री. सचिन हाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर मंडळामद्धे हरभरा पिकाचे पाच प्रकल्प राबविले जात आहेत. या अंतर्गत आज मंडळ कृषि अधिकारी अप्पासाहेब झंजे यांच्या हस्ते सदोबाचीवाडी येथे बियाणे, राझोबीयम, पी. एस. बी या निविष्टांचे वाटप करण्यात आले. यावेळी उप कृषि अधिकारी माने यांनी हरभरा पिक लागवडिविषयी मार्गदर्शन केले, यामद्धे बिजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन इ. बाबत माहिती दिली. मंडळ कृषि अधिकारी अप्पासाहेब झंजे यांनी कृषि विभागाच्या योजना, केळी लागवड इ. बाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषि अधिकारी मिथुन बोराटे यांनी महाविस्तार AI अँप बाबत माहिती दिली व अँप वर नोंदणी करून घेतली. यावेळी गटातील आनंद कारंडे,सुरज सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, सतिश घाडगे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांनी केले.















