प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर .२०२५ रोजी ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा व प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या शिवाजीराव काकडे देशमुख यांनी शाल,श्रीफळ व रोप देऊन केले. ज्युबिलियंट भारतीया फाउंडेशनचे मा. श्री.इसाक मुजावर साहेब, मा. श्री. अजय ढगे साहेब व प्रशांत क्षीरसागर साहेब उपस्थित होते.
यावेळी आपत्ती व्यवस्थापना विषयी माहिती मा.श्री. प्रशांत क्षीरसागर साहेब यांनी दिली.आगीची कारणे,आग विझवण्याचे उपाय, आगीचे एबीसीडी आणि के हे प्रकार, आग आटोक्यात आणण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी माहिती सांगितली आणि प्रात्यक्षिके करून दाखविली. यामध्ये विद्यालयातील स्टाफ तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा प्रत्यक्ष सहभाग घेण्यात आला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा ते प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच प्रात्यक्षिके मुलांच्या कडून करून घेतली. अग्निशामक दलाची गाडी आणली होती. फायर ब्रिगेडची क्षमता यावर माहिती देवून त्याचेही प्रात्यक्षिक शाळेच्या मैदानावर करून दाखवले. यावेळी गाडीतून जाणाऱ्या पाण्याच्या वेगा विषयी माहिती दिली मोठी आग कशी आटोक्यात आणावी याविषयी माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्षा मा.सौ. सुप्रियाताई अश्विन कुमार पाटील,जेष्ठ संचालक मा.श्री.भीमराव बनसोडे सर व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आणि विद्यार्थी सुरक्षा विषयी असे कार्यक्रम शाळेत आयोजित करण्याविषयी आवाहन करण्यात आहे.















