बारामती ! संविधान दिनानिमित्त होळ आठफाटा येथील शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप .
1 min read

बारामती ! संविधान दिनानिमित्त होळ आठफाटा येथील शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप .

प्रतिनिधी –

२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त होळ आठफाटा ग्रामपंचायत व परिसरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन होळ गावचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सुरज कांबळे यांच्यावतीने करण्यात आले होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी होळ ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठफाटा , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायाळपट्टा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळ गावठाण येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक संभाजी नाना होळकर , विद्यमान सरपंच सुरज यशवंत कांबळे , उपसरपंच रमेश यशवंत वायाळ ,माजी सरपंच विद्यमान सदस्य संतोष होळकर पाटील , माजी सरपंच विठ्ठल नाना वायाळ ,यशवंत कांबळे संचालक पतसंस्था फेडरेशन बारामती, आबाजी नाना वायाळ , एल के(मामा) होळकर , तसेच ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांचे उपस्थित संविधानाचे वाचन करून शपथ घेण्यात आली व विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊ वाटप करण्यात आले .