श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी ठीक १०.३० वा. प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना घोषणा फलक देण्यात आले होते त्यावर संविधानाविषयी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या प्रभात फेरी संपूर्ण गावातून काढून संविधानाविषयी जागृती करण्यात आली.
त्यानंतर विद्यालयात संविधानावर आधारित पथनाट्य इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले त्यानंतर भारतीय संविधान प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
विद्यालयातील इयत्ता १०वीच्या ऋतुजा बनसोडे प्रेमराज भंडलकर या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रश्नमंजुषा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाला त्यामुळे विद्यार्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढले तसेच विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमामुळे गटाने कार्य करण्याची सवय लागते. स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण होते त्यामुळे हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्री. नारायण राजुरवार आणि पंचायत समिती बारामती समन्वयक मा. श्री. वैभव थोपटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आलेल्या मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले. प्रमुख प्रा.मा. श्री. राजुरवार सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
संविधान दिनानिमित्त विद्यालयात सामूहिक संविधानाचे वाचन करण्यात आले तसेच मानवी साखळी तयार करण्यात आली व संविधानावर आधारित पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.प्रश्नमंजुषा मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना तसेच
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शना नंतर झालेल्या प्रश्न उत्तर सदरामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले अशा विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते वही आणि पेन देऊन अभिनंदन करण्यात आले.अशा प्रकारे भारतीय संविधान दिन विद्यालयात उत्साहात पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष . श्री.सतीश काकडे . उपाध्यक्षा .सौ. सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील,जेष्ठ संचालक श्री.भीमराव बनसोडे व मानद सचिव श्री.मदनराव काकडे दे. यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
