पाचट कुट्टी व्यवस्थापन कार्यशाळेचे वानेवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजन.
1 min read

पाचट कुट्टी व्यवस्थापन कार्यशाळेचे वानेवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजन.

प्रतिनिधी.

बारामती येथे ऊस पाचट व्यवस्थापन मोहिमे अंतर्गत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. बारामती तालुक्याच्या बागायत क्षेत्रामधील वडगाव नि. कार्यक्षेत्रामद्धे जवळपास 2500 हे. गळापायोग्य क्षेत्र असून कारखाने चालू झाले आहेत. बहुतांश शेतकरी ऊस पाचट व्यवस्थापन करत आहेत. कृषि विभागाने मागील 3-4 वर्ष मोहिने द्वारे जनजागृती केली आहे. त्यामुळे ऊस पाचट व्यवस्थापनाचे क्षेत्र वाढलेले आहे. परंतु योग्य शास्त्रीय पद्धतीचा अवलंब होत नाही. त्यासाठी चालू हंगामात सुद्धा उप विभागीय कृषि अधिकारी मा. चौधरी साहेब,तालुका कृषि अधिकारी मा. सचिन हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी प्रात्यक्षिका द्वारे माहिती दिली जात आहे. याच मोहिमे अंतर्गत वानेवाडी येथे निखिल भोसले यांच्या क्षेत्रावर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मा. सचिन हाके साहेब यांनी ऊस पाचट व्यवस्थापणामुळे होणारे फायदे, यात जमिनीतील सेंद्रिय कर्ब, जल धारण क्षमता यामद्धे वाढ होते, तणांची वाढ होत नाही, मजुरीवरील खर्च कमी होतो इ. बाबी विषद केल्या. तसेच पाचट व्यवस्थापन करताना पाचटाचे लहान तुकडे, पाचट कुट्टी मशीन च्या सहाय्याने करून घ्यावेत, पाचट सरिमद्धे घ्यावे, त्यावर हेक्टरी 80किलो युरिया, 100किलो सुपर फोस्फेट, व 10 किलो /लिटर पाचट कुजवीणारे जिवाणू, एकसारखे द्यावे त्यानंतर पाणी द्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी निखिल भोसले यांनी आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक कृषि अधिकारी प्रियांका मदने यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळ कृषि अधिकारी मा.अप्पासाहेब झंजे साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उप कृषि अधिकारी प्रवीण माने, सहाय्यक कृषि अधिकरी रणजित धुमाळ व शेतकरी उपस्थित होते.