Image

शासनाचे फसवणूक केल्या बाबत गुन्हा दाखल .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

शासनाची फसवणूक करून बोगस रेशनकार्ड तयार करुन कानाळवाडी ता. बारामती जि. पुणे येथील संदीप धनंजय भोसले या व्यक्तीचे नाव एकाच वेळेस दोन रेशन कार्ड मध्ये उपलब्ध . याप्रकरणी आशपाक हनीफ इनामदार तलाठी रा. निंबूत ता. बारामती यांच्या फिर्यादी वरुन महाराष्ट्र सरकारने शासनाची सवलती व लाभ मिळण्याकरिता वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर रेशन कार्ड दिले जाते.

या प्रत्येक रेशन कार्डला शासनाची वेगवेगळे सवलती असतात इसम नामे संदीप धनंजय भोसले रा. कानाळवाडी ता. बारामती जि. पुणे ही व्यक्ति एकच नाव दोन रेशनकार्ड मध्ये नोंदणी करून त्यांचे शासनाने दिलेल्या धान्य घेऊन शासनाचे फसवणूक केली. संदीप धनंजय भोसले हे मौजे कानाळवाडी येथील रहिवाशी असून त्याचे वडील धनंजय जयसिंग भोसले यांचे नावे केसरी रंगाचे रेशन कार्ड नंबर 272012376656 असा आहे. त्या रेशन कार्ड मध्ये संदीप धनंजय भोसले यांचे नाव आहे संदीप भोसले यांनी त्याचे वडिलांचे नाव असलेले रेशन कार्ड मधील नाव कमी न करता त्यास आपले वडिलांचे रेशन कार्ड मध्ये आपले नाव आहे हे माहीत असताना देखील त्याने बारामती येथे दी 18/2/2022 च्या दरम्यान तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्याचे व त्याची पत्नी सौ. मनीषा संदीप भोसले याचे नावाने दुसरे केशरी रंगाचा रेशन कार्ड नंबर 272027289596 हे स्वतःला लाभ मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गी रेशनकार्ड काढून त्या रेशन कार्ड वर पहिले नाव असलेले रेशन कार्डवर शासकीय धान्य घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. यावरून फिर्यादी यांच्या फिर्याद वरुन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास पो. ना. मनेरी हे करित आहेत.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026