वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातावरती उपायोजना कराव्यात नागरिकांची मागणी.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

रस्ते अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे यावरती ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे जसं की स्पीड लिमिट, स्पीड ब्रेकर यासारख्या उपाययोजना ग्रामीण भागात देखील करण्यात याव्यात अशी सामान्य नागरिक मागणी करत आहे. ज्याप्रमाणे हायवे ला स्पीड तपासणी यंत्र कार्यरत आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील देखील हायवे वरती अशी यंत्रणा कार्यरत करावी. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांवरती वाहन चालक वेगाची कोणतीही मर्यादा न पाळता सुसाट वेगाने वाहने चालवून आपला जीव गमावत आहेत. इतर आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाणापेक्षा देखील रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण हे जास्तीच आहे. अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र या रस्ते अपघातामुळे जात आहेत. आणि यामुळेच कदाचित बाल गुन्हेगारी देखील वाढत आहे? त्यामुळे संबंधित प्रशासनाने ग्रामीण भागातील रस्ते अपघातांचा विचार करून त्वरित काही उपाययोजना करता येतील का याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे