• Home
  • इतर
  • पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
Image

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी.

युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग

हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ काम करायचे म्हणून करू नये तर; ते काम तुमचे पॅशन झाले पाहिजे. हेच पॅशन तुमचे प्रोफेशन बनले पाहिजे.त्यामुळे तुमचे पॅशन अशा पध्दतीने विकसित करा की जे तुम्हाला उच्च स्थानावर घेऊन जाईल, त्याच दृष्टीने युईआय ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूट देशभरातील 9 कॅम्पसच्या माध्यमातून सुमारे 20 वर्षांपासून काम करत आहे,असे प्रतिपादन युईआय ग्लोबल एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक (MD) व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मनीष खन्ना (Manish Khanna, Managing Director, UIE Global Education)यांनी केले.
UEI ग्लोबल एज्युकेशनतर्फे पुण्यातील मुळाशी येथील द फॉरेस्टा रिसॉर्ट येथे आयोजित तिसऱ्या UEI कलिनरी कॉम्पिटिशन-2025 ( पाककृती स्पर्धा) (UEI Culinary Competition-2025) स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मनीष खन्ना बोलत होते. याप्रसंगी इंडियन कुलिनरी फोरम उपाध्यक्ष शेफ शिशिर सक्सेना ,पुण्यातील JW Marriott चे एक्झिक्युटिव्ह शेफ मिहीर काले ,L&D, Marriott International Asia Pacific & Chinaचे माजी संचालक नरेश कपूर , IHM भोपाळचे माजी प्राचार्य आनंद कुमार, ICF चे जॉइंट सेक्रेटरी अरविंद राय , ITC चे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ आलोक , Novotel – Accor Group चे एक्झिक्युटिव्ह शेफ गौरव मावरी , कुलिनरी कन्सल्टंट व उद्योजक शेफ सिद्धार्थ शिंत्रे , YCMOUचे संचालक डॉ. जयदीप निकम, Taj चे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ, व माजी डीन शेफ हेमंत गोकळे, फॉरेस्टा रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनीष खन्ना म्हणाले, यूसीसी हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा उपक्रम असून तो पाककलेचे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि व्यावसायिक यांना एकत्र आणतो. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच खाद्यकलेबद्दलची आवड शोधण्याची, शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी देतात. यूसीसी केवळ त्यांना उत्तम कामगिरीसाठी प्रेरित करत नाही, तर त्यांना त्यांच्या पाककौशल्यांचे प्रदर्शन, उद्योगातील दिग्गजांशी नेटवर्किंग आणि ओळख मिळवण्याचे व्यासपीठही देते.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी भारतातील विविध संस्कृती, परंपरा आणि वारसा प्रादेशिक पाककृतींमधून एकत्र सादर करतात.
गुरूवारी (दि.18 ) UEI कलिनरी कॉम्पिटिशन 2025 चे उद्घाटन झाले असून तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मिस्ट्री बॉक्स चॅलेंज, ड्रेस अ केक, ग्लोबल बिर्याणी आणि इनोव्हेशन फ्युजन अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. अंतिम फेरी ही नॉक-आउट स्वरूपाची असून, त्यातून विजेता आणि उपविजेते निवडले जाणार आहेत. विजेता आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके, पदके तसेच Golden Chef Coat सह प्रतिष्ठित MasterChef UCC हा किताब प्रदान करण्यात येणार आहे,असेही मनीष खन्ना यांनी सांगितले.
स्पर्धेविषयी माहिती देताना पुण्यातील युआयई ग्लोबल एज्युकेशनच्या उपसंचालिका वैशाली पाटील म्हणाल्या, या स्पर्धेत यूईआय ग्लोबलच्या सर्व कॅम्पस मधून सुमारे 150 होतकरू शेफ्स सहभागी झाले आहेत. ते प्रादेशिक, भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पदार्थ सादर करत UCC Master Chef 2025 या प्रतिष्ठित किताबासाठी स्पर्धा करणार आहेत. हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण क्षेत्रात सुमारे 20 वर्षांचा अनुभव असलेल्या यूईआय ग्लोबल एज्युकेशनने आजपर्यंत 25 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून देश-विदेशातील नामांकित स्टार कॅटेगरी हॉटेल्समध्ये यशस्वीपणे प्लेसमेंट दिले आहे. यूईआय ग्लोबलचे अभ्यासक्रम यूके, स्वित्झर्लंड, कॅनडा तसेच इतर अनेक देशांमध्ये लॅटरल एंट्रीसाठी मान्यताप्राप्त आहेत.

Releated Posts

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025

३६४ पोलिस निरीक्षकांची पदोन्नती फक्त २४ तासांत रद्द : पोलिस दलात खळबळ

प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलातील मोठ्या घडामोडीत ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांची (API) पोलिस निरीक्षक (PI) पदावर करण्यात आलेली पदोन्नती…

ByBymnewsmarathi Aug 23, 2025