ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार ते बुवा साहेब चौक या परिसरात नेहमीच होत आहेत अपघात जबाबदार कोण?

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

पुरंदर. ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार ते बुवा साहेब चौक यादरम्यान नेहमीच टू व्हीलर घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. याचं कारणही तसंच आहे. या परिसरामधील रस्त्याच्या कडेचे गाळे धारकांनी आपल्या गाळ्याचे रीनोवेशन केलेली आहे त्या रेनीवेशन करण्यासाठी बांधकामासाठी आणलेली डस्ट काम झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळेच हे अपघात होत आहेत? संबंधित गाळे धारकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून असे सांगितले जाते की ही डस्ट आमची नसून गटर लाईनच्या कामाला आणलेली होती. वारंवार ग्रामपंचायत निरा शिवतक्रार यांच्याकडे तोंडी तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने देखील या गोष्टीकडे लक्ष दिलेले नाही? पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना देखील वारंवार भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून या रस्त्याच्या कडेला पडलेली डस्ट रस्त्यावरती येत आहे व त्यामुळे टू व्हीलर घसरून पडत आहेत आपण त्वरित ती डस्ट ज्याची कुणाची आहे त्यांना सांगून तेथून काढून टाकावी मात्र पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांनी देखील या गोष्टीची कोणतीही दखल न घेता फक्त टाळाटाळ केलेली दिसत आहे? लाखो रुपये खर्च करून सरकार रस्ते गुळगुळीत करत आहे मात्र त्या रस्त्याची देखभाल ,त्या रस्त्याची मरमपट्टी यावरती पीडब्ल्यूडी चे लक्ष असायला हवं मात्र असं होताना दिसत नाही? पीडब्ल्यूडी चे अधिकारी कर्मचारी नक्की कोणत्या कामात व्यस्त आहेत असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे. गाडी घसरून एखादा मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मदत देण्यापेक्षा अपघात होऊच नये यासाठी डस्ट काढली तर केव्हाही चांगलेच. ज्या गाळ्यासमोर डस्ट पडलेली आहे त्यांना ग्रामपंचायत अथवा पीडब्ल्यूडी नोटीस देणार का त्यांना डस्ट काढण्यासाठी सांगणार का अजून एखादा अपघात होण्याची वाट पाहावी लागणार?