रेल्वेत अवैध विक्री अंगलट, 2731 जणांना अटक, कोट्यवधींचा दंड

प्रतिनिधी मध्य रेल्वेत अवैधरित्या खाद्यपदार्थांची विक्री करणे फेरीवाल्यांना अंगलट आले. मध्य रेल्वेकडून या अवैध फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. २१ हजार ७४९ प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच २१ हजार ७३६ […]

Continue Reading

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी 5 पाईपद्वारे झाला संपर्क 

प्रतिनिधी उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. आत अडकलेल्या ४० मजुरांना बाहेर काढण्यात गुरुवारी रात्री उशिरा मोठे यश मिळाले. बोगद्यात 900 मिमी रुंदीचे आणि 6 मीटर लांबीचे पाच पाईप टाकण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीने अडकलेल्या लोकांशी संपर्क साधता येईल. ढिगाऱ्यात काही कठीण पदार्थ असल्यानं ड्रिलिंगची प्रक्रिया तात्पुरती थांबवल्याचं सांगण्यात आलं. […]

Continue Reading

प्रकाश’वाटेवरील महावितरणची घौडदौड

संपादक मधुकर बनसोडे. अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणेच आता वीज देखील मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय प्रगतीचा विचारच होऊ शकत नाही. मुंबई शहर वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात वीज क्षेत्रामध्ये राज्याची वेगाने आगेकूच सुरू आहे. महावितरणकडून केंद्र व […]

Continue Reading

साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य सेवेत आणखी एक कौतुकाची भर.

प्रतिनिधी. कौतुकास्पद ! इंटरनॅशनल एक्सलन्स हेल्थ आरोग्य अवॉर्ड द्वारे साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु यांना बेस्ट हॉस्पिटल रुरल एरिया याने सन्मानित . सोमेश्वरनगर – १ जुलै हा डॉक्टरांचा दिवस आहे. (डॉक्टर डे) म्हणून सर्वत्र साजरा करतात …हा दिवस आमच्यासाठी सर्वात अविस्मरणीय आहे…त्याचे कारण आम्ही ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत आणखी एक मानाचा […]

Continue Reading

जमीन विक्रीस इच्छुक जमीन मालकांनी संपर्क करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन*

पुणे, दि. २६: कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना शेतजमिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या जमीन मालकांना त्यांचेकडील कसण्यास योग्य असलेली जमीन विकावयाची असेल त्यांनी समाज कल्याण विभागाकडे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे. संबंधित जमीन […]

Continue Reading

पोलिस महानिरीक्षकांचे आदेश ” फसवणूक करणाऱ्या मुकदमांवर होणार कारवाई ; ऊस वाहतूकदारांना मिळणार दिलासा.

प्रतिनिधी – फिरोज भालदार ऊस मुकादमांकडून सातत्याने होत असलेल्या फसवणुकीमुळे अनेक ऊस वाहतूकदार कर्जबाजारी झालेत. याबाबत वारंवार तक्रार होत असल्याने पोलिस महानिरीक्षकांनी दखल घेतली आहे. फसवणूक करणाऱ्या मुकादमावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे फसवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊसतोडणी मजूर पुरवठा करीत असताना मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक […]

Continue Reading

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी शेतकऱ्यांना दिलासा

प्रतिनिधी मुंबई, दि. १० : राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन […]

Continue Reading

राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या आदेशावरून ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती च्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी अमित बगाडे यांची निवड

 प्रतिनिधी सोपान कुचेकर. बारामती -: भारत सरकार नोंदणी कृत मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती पूर्ण भारतात राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांसाठी ही संघटना अहोरात्र काम करीत आहे तसेच असंख्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे. तसेच मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती मा. एस. एस. साबणे साहेब (माजी.न्यायाधीश […]

Continue Reading

मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी

सोमेश्वरनगर,दि. २० फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. सध्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा चालू आहेत. उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. […]

Continue Reading

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..!

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा […]

Continue Reading