बारामती ! वडगांव निंबाळकर मध्ये गावांची दिशा दर्शविणाऱ्या फलकाची दूरअवस्था ; पी डब्ल्यू डी प्रशासनाचे दुर्लक्ष .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील राजे उमाजी नाईक चौक या ठिकाणी मागील वीस दिवसांपूर्वी गावांची दिशा दर्शविणारा फलक पडला आहे . मात्र या फलकाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे . हा फलक ( बोर्ड ) मूळ निरा – बारामती रोडवर असून या रोडवरून या चौकातून चार रस्ते […]

Continue Reading

कोऱ्हाळे येथील शिंदे कुटुंबियांनी साकारला शिवकालीन देखावा

प्रतिनिधी. कोऱ्हाळे बुद्रुक येथील शिंदे कुटुंबीय नेहमीच गौरीपूजनाला सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतात. यावेळी त्यांनी साकारलेला शिव चरित्रातील देखावा पाहण्यास परिसरातील महिलांची गर्दी होत आहे. माळशिकारे वाडी येथील सुषमा शिंदे, मयुरी शिंदे,वैशाली शिंदे, मनीषा शिंदे, आकांक्षा कदम, ललिता शिपळकर यांनी हा देखावा साकारला आहे. देखाव्यात किल्ले रायगड, जिजाऊ, भवानी माते कडून तलवार घेणारे […]

Continue Reading

दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी जगदीप वनशिव पुणे- येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या तर्फे या वर्षीचा मानाचा पुरस्कार मा. दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव चव्हाण उपाध्यक्ष सुनिल राव रासने उत्सव प्रमुख अक्षय प्रतापराव गोडसे कोषाध्यक्ष महेशभाऊ सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुरस्कार देवून […]

Continue Reading

कोऱ्हाळे बुद्रुक येथे उमाजीराजे नाईक जयंती साजरी

सोमेश्वरनगर – हेमंत गडकरी आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांची २३३ वी जयंती कोऱ्हाळे बुद्रुक येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त राजे उमाजी नाईक तरुण मंडळाच्या वतीने कोऱ्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश हुंबे, नंदकुमार खोमणे, अमित खोमणे, विनोद खोमणे, सुनील खोमणे, अमित मदने, मुख्याध्यापक […]

Continue Reading

सोमेश्वर चे संचालक प्रवीण कांबळे यांचा राजीनामा! घरगुती कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती. मात्र परिसरामध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण.?

प्रतिनिधी. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण कांबळे यांनी आज घरगुती कारणास्तव राजीनामा देत असल्याचे समजत आहे. मात्र वास्तविक परिस्थिती काही वेगळीच असल्याची चर्चा स्थानिकांमधून होत आहे.? कांबळे यांचे संस्थे बाबतीत काही गैरवर्तनाचे प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावरती गेल्यामुळे कांबळे यांना त्वरित राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देखील सूत्रांकडून समजते. नक्की असे […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व करंजेपुल दुरक्षेत्र येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न ; रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणपती मंडळे, सर्व पोलीस पाटील तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व वडगाव निंबाळकर अंकीत करंजेपुल पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते . सकाळ […]

Continue Reading

संत निरंकारी मिशनद्वारा काळेवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, ९ सप्टेंबर २०२४: सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच काळेवाडी, येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, ८ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनच्या २४० अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये संत निरंकारी रक्तपेढी मुंबई आणि वाय.सी.एम रुग्णालय […]

Continue Reading

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी*

पुणे, दि.८:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. या योजनेंतर्गत माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३३ वी जयंती उत्साहात साजरी .

प्रतिनिधी फिरोज भालदार आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३३ वी जयंती वडगाव निंबाळकर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. राजे उमाजी नाईक यांच्या २३३ व्या जयंती उत्साह सोहळ्यानिमित्त वडगाव निंबाळकर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी भारताचे प्रथम क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांवरती […]

Continue Reading

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा..*

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाने झाली.या प्रदर्शनाचे उद्घाटन दैनिक सकाळचे जेष्ठ पत्रकार माननीय श्री संतोष शेंडकर आणि संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री.भीमराव बनसोडे सर यांच्या शुभहस्ते झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आलेल्या […]

Continue Reading