आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी सोमेश्वर च्या चेअरमन संचालक मंडळाला जाग येणार का?

 संपादक मधुकर बनसोडे.  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी तारीख पे तारीख सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे प्रथमदर्शनी अहवालातून सिद्ध झाली मात्र अद्यापही सोमेश्वरच्या कारभाऱ्यांकडून दोषींवरती कोणतीही कायदेशीर कारवाई केल्याचे दिसत नाही. सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळा झोपेच सोंग घेऊन या प्रकरणांमधून नक्की कोणाला […]

Continue Reading

निंबुत ग्रामपंचायत साठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी सरपंच पदासाठी बांधले गुडघ्याला बाशिंग.

 संपादक मधुकर बनसोडे.  नींबूत ग्रामपंचायत साठी पहिल्यांदाच निवडला जाणार जनतेतून सरपंच  नींबूत ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ही सर्वसाधारण पुरुष झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पदाची तयारी सुरू केल्याचे चित्र नींबूत इथे दिसत आहे.  नींबूत गाव हे विकासाचे गाव म्हणून नींबूत गावाची एक वेगळी ओळख आहे. नींबूत गावचे राजकारण तालुक्यापुरते मर्यादित नसून नींबूच्या […]

Continue Reading

वडगाव निंबाळकर अंकित करंजे पूल पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई. अवैद्य दारू विक्रेत्याच्या आवळल्या मुस्क्या 

प्रतिनिधी. फिर्यादी.निलेश चंद्रकांत जाधव पो.कॉ.ब.नं.२६९७ नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण. समक्ष वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र मधील संगणक कक्षातील संगणका समोर हजर राहुन सांगतो सरकार तर्फे फिर्यादी जबाब की, मी वरील पोलीस स्टेशनला सुमारे १ वर्षा पासुन पोलीस शिपाई म्हणुन नेमणुकीस आहे. आज दिनांक २७/०४/२०२५ रोजी दुपारी १३:०० वा चे […]

Continue Reading

बारामती ! ‘ माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे ‘ तू मला होकार दे नाहीतर मी फाशी घेईल असे म्हणत ब्लॅकमेल केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर येथील तरुणावर गुन्हा दाखल .

प्रतिनिधी – ” तु मला खूप आवडतेस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तु मला होकार दे तू नाही म्हणलीस तर मी फाशी घेईल” असे म्हणत तरुणीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये वडगाव निंबाळकर येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार .. २२ जानेवारी २०२५ रोजी ते २६ एप्रिल २०२५ रोजी […]

Continue Reading

स्नेह मेळाव्यानिमित्त 25 वर्षानंतर पुन्हा भरली बा.सा.काकडे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची शाळा. माजी विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष झाले भावुक.

 प्रतिनिधी            निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेच्या निंबूत व पिंपरे खुर्द या दोन्ही विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार दि.२६ एप्रिल २०२५ रोजी सायं.६.०० वा.संपन्न झाला. विद्यालयास पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे देशमुख,उपाध्यक्षाआणि निमंत्रक सौ.सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील तसेच उपाध्यक्ष […]

Continue Reading

बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर; येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार

बारामती, दि. २५ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून या बाबतच्या मान्यतेचे पत्र आज आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून यंदापासून […]

Continue Reading

बारामती ! युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६१ रक्तदात्यांनी केले रक्तदान .

प्रतिनिधी – फिरोज भालदार युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अस्लम रज्जाक तांबोळी (अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग) व मुन्नाभाई बागवान (उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) तसेच फुल अँड फायनल ग्रुप बारामती वतीने आयोजित केलेलं रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. सावित्रीमाई फुले सभागृहात आयोजित शिबिराला बारामती […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकर चळवळीचे स्वाभिमाने नेते वैभव गीते , बहुजन हक्क परिषद संस्थापक सुनील ( तात्या ) धीवार, व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी आंबेडकर चळवळीचे स्वाभिमाने नेते वैभव गीते यांनी […]

Continue Reading

संत निरंकारी मिशन कडून मानव एकता दिवसाचे आयोजन

प्रतिनिधी संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी सह देश-विदेशात ५०० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन             आध्यात्मिकताच मानव एकता मजबूत करु शकते तसेच मानवाला मानवाच्या जवळ आणून परस्पर प्रेम व सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ […]

Continue Reading

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन .

प्रतिनिधी –   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे दिनांक 15 एप्रिल 2025 ते 30एप्रिल 2025 या कालावधीमध्ये शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना बालवयात बालमनावर रुजवायच्या छोट्या छोट्या गोष्टी, सकाळी उठण्याच्या सवयी , गुरुजनांचा आई-बाबांचा आदर . ओंकार ध्यान – धारणा गप्पागोष्टी योग अभ्यासाचे धडे अनुलोम मिलन यासारखे […]

Continue Reading